Manish Jadhav
ॲपल वेळोवेळी मोबाईलप्रेमींसाठी नवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. पण आता ॲपलने iPad Air लॉन्च केले आहे.
ॲपलने भारतीय बाजारपेठेत नवीन M3 चिपसह iPad Air लॉन्च केले. मात्र नवीन आयपॅडच्या स्क्रीन साइजमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पूर्वीप्रमाणेच, तुम्हाला 11 इंच आणि 13 इंच स्क्रीन साइजचे नवीन आयपॅड मिळतील, परंतु M1 मॉडेलच्या तुलनेत नवीन आयपॅडचा परफॉर्मेंस डबल करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, आता नवीन आयपॅडसह ॲपल वापरकर्त्यांना चांगला परफॉर्मन्स मिळणार आहे.
8 कोर जीपीयू, 9 कोर जीपीयू आणि एम3 चिपमुळे, नवीन आयपॅडचा परफॉर्मेंस डबल झाला आहे. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ॲपलने या नवीन मॉडेलमध्ये ॲपल इंटेलिजन्स सपोर्टसह एआय फीचर्स समाविष्ट केले आहेत.
तुम्हाला 11 इंच आणि 13 इंच स्क्रीन साइजचे मॉडेल मिळतील, ज्यात 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. एवढेच नाही तर नवीन आयपॅड नवीन iPadOS आणि USB टाइप-सी पोर्टसह लॉन्च करण्यात आले आहे.
11 इंच मॉडेलची किंमत 59,900 रुपयांपासून सुरु होते, तर 13 इंच मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते.
नवीन आयपॅड एअरची प्री-बुकिंग सुरु झाली असून तुम्ही कंपनीच्या अधिकृत साइटद्वारे हे डिव्हाइस प्री-बुक करु शकता. विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, हा नवीन आयपॅड पुढील आठवड्यापासून म्हणजेच 12 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.