Sameer Amunekar
सफरचंदाच्या सालीत फायबर, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन A आणि C मुबलक प्रमाणात असतात. साल काढल्यास ही पोषक तत्त्वं नष्ट होतात.
सालीतील फायबर पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढवते आणि बद्धकोष्ठतेपासून संरक्षण देते. त्यामुळे सालासह सफरचंद खाणे पचनासाठी चांगले.
सफरचंदावर स्प्रे केलेली रसायने किंवा कीटकनाशके सालीवर राहू शकतात. त्यामुळे खाण्यापूर्वी नीट धुवून घ्या.
जर सफरचंद सेंद्रिय (organic) असेल, तर सालासह खाणे सर्वात योग्य. त्यात नैसर्गिक पोषक तत्वांचा फायदा अधिक मिळतो.
जर साल आवडत नसेल, तर सालीसकट सफरचंद चांगले धुवून किसून किंवा ज्यूसमध्ये वापरल्यास पोषण टिकून राहते.
या घटकांमुळे शरीरातील सूज कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सफरचंद ५-१० मिनिटे कोमट पाण्यात मीठ किंवा व्हिनेगर टाकून धुवा आणि नंतर सालीसकट खा. ही पद्धत सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.