Manish Jadhav
अपराजिताच्या फुलांना शंखपुष्पी म्हणूनही ओळखले जाते. या फुलांमध्ये असलेले घटक मेंदूच्या पेशींना बळ देतात, ज्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता सुधारते.
अपराजिताच्या फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटी-स्ट्रेस गुणधर्म असतात. याचा चहा प्यायल्याने चिंता, तणाव आणि नैराश्य कमी होऊन मन शांत राहण्यास मदत होते.
अपराजिताची फुले मूत्रवर्धक असतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त मीठ मूत्रावाटे बाहेर टाकले जाते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.
या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने ते त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. तसेच, केसांच्या मुळांना बळकट करुन केस गळणे थांबवतात.
काही अभ्यासांनुसार, अपराजिताच्या फुलांचा अर्क रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो.
अपराजिताची फुले नैसर्गिकरित्या रेचक गुणधर्म दर्शवतात. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते.
या फुलांच्या उपयोग डोळ्यांशी संबंधित विकारांवर उपचार करण्यासाठी पारंपरिकरित्या केला जातो. हे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांचा ताण कमी करण्यास मदत करते.
अपराजिताच्या फुलांमध्ये दाहक-विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते.