Rahul sadolikar
रब ने बना दी जोडीच्या जबरदस्त यशानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग चित्रपट देत तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
अनुष्का आज 35 वर्षांची झाली आहे. आज तिच्या एका व्हायरल व्हिडीओची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या अनुष्काच्या एका व्हायरल व्हिडीओची सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे.
अनुष्काने व्हायरल व्हिडीओमध्ये बोलताना ती त्यांना एक मोठं गुपित सांगायला तयार असल्याचं सांगितलं आहे आणि मग ऑडिशनचा तो व्हिडिओ दाखवला
तिने सांगितले की 2007 मध्ये तिने एका मोठ्या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. आणि हा चित्रपट होता राजु हिराणींचा सुपर-डुपर हिट थ्री इडियटस
अनुष्काने थ्री इ़डियट्ससाठी ऑडिशन दिली होती ही गोष्ट आमिर आणि राजू हिराणी दोघांनाही माहित नव्हती.
जेव्हा अनुष्काने हा ऑडिशनचा व्हिडिओ आमीर आणि राजु हिराणींना पीकेच्या सेटवर दाखवला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.