Pranali Kodre
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे.
त्यांची पहिली ओळख एका शाम्पूच्या जाहिरातीच्या शुटच्या सेटवर झाली होती.
त्यावेळी एका मुलाखतीत अनुष्काने सांगितल्या प्रमाणे तिला विराट अहंकारी वाटला होता आणि म्हणूनच तिने स्वत: देखील त्याच्या समोर अहंकार मिरवला होता.
तिने सांगितले की, तिला त्याच्यापेक्षा वरचढ दिसायचे होते.
पण जेव्हा ती त्याला भेटली आणि त्याच्याशी चर्चा केली, तेव्हा तो तिला हुशार, सहज आणि विनोगी वाटला.
तिने असेही सांगितले की त्या जाहिरातीचे 3 दिवस शुट होते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने तिच्या नव्या घराचा आनंद साजरा करण्यासाठी तिच्या मित्र-मैत्रिणींना डिनरसाठी बोलावले, तेव्हा विराटलाही आमंत्रण दिले होते.
नंतर विराट आणि अनुष्कामध्ये हळुहळू मैत्री वाढत गेली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
अखेर त्यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
त्यांना आता एक मुलगी असून तिचे नाव वामिका आहे.