Pramod Yadav
सांकवाळ येथे कॅथोलिक बांधवांची वार्षिक लेंटेन पदयात्रा पार पडली.
जवळपास 17,000 कॅथोलिक बांधव या पदयात्रेत सहभागी झाले होते.
गोवा आणि दमणच्या आर्कडीओसीजच्या वतीने लेंटेन पदयात्रा आयोजित केली होती.
‘होली ट्रिनिटीशी एकरूप होऊन आपले ध्येय जगणे’ अशी या वर्षीची थीम होती.
पदयात्रेत वास्को, वेल्हा, वेर्णा यासह विविध ठिकाणावरील लोक सहभागी झाले होते.
कर्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले व पदयात्रेला येऊ न शकलेल्या प्रियजनांसाठी प्रार्थना करण्यास सांगितले.
मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या पदयात्रेत सहभाग घेतला होता.