Akshata Chhatre
आपण प्रोफेशनल वातावरणात काम करत असताना रागावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. छोट्या-छोट्या गोष्टींवर राग काढणं, ओरडणं किंवा विचित्र वागणं हे आपल्या करिअरसाठी घातक ठरू शकतं.
ऑफिसमध्ये राग वाढण्याची अनेक कारणं असू शकतात जसे की चिडचिडे बॉस, कामाचा ताण, किंवा ऑफिस पॉलिटिक्स.
अशा वेळी सर्वात आधी आपले ट्रिगर पॉइंट्स ओळखणं गरजेचं आहे.
रागाच्या क्षणी विचारांवर नियंत्रण ठेवणं अवघड असलं तरी शांतपणे बोलणं, शब्द काळजीपूर्वक निवडणं आणि आत्मनियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
राग दडपण्याऐवजी त्याची जाणीव ठेवून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणं अधिक उपयुक्त असतं.
नकारात्मक विचार मनात साचू नयेत म्हणून ते कागदावर लिहिणं ही एक चांगली पद्धत आहे.
या उपायांमुळे रागावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं आणि प्रोफेशनल जगात आपली प्रतिमा जपली जाते.