Sameer Amunekar
भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कोच संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर नेहमी चर्चेत असते. पूर्वी तीची आर्यन म्हणून ओळखली जात होती, पण जेंडर ट्रान्सफॉर्मेशन करत तिने ‘अनाया’ हे नाव धारण केले.
अनायाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर विराट कोहलीसोबतचा एक जुना व्हिडीओ शेअर केला, जो लगेचच व्हायरल झाला.
या व्हिडीओमध्ये विराट कोहली एका लहान मुलाला बॅटिंग टिप्स देताना दिसतो. तो मुलगा म्हणजेच आर्यन (सध्याची अनाया) आहे.
व्हिडीओसोबत अनायाने लिहिले: “त्यावेळी एक मुलगा विराटकडून टिप्स ऐकत होता. भारतीय महिला संघात स्थान मिळवण्यासाठी आज मी लढत आहे. काही स्वप्न कधीच बदलत नाहीत.”
अनायाला क्रिकेटची प्रचंड आवड असून, तिने अनेत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती बॅटिंग करताना दिसते.
अनाया नेहमी विराट कोहलीची स्तुती करते. तिच्या म्हणण्यानुसार विराट अत्यंत समर्पणाने प्रॅक्टिस करत असे आणि प्रॅक्टिसवेळी अतिशय गंभीर असे.
जेव्हा संजय बांगर भारतीय संघाचे प्रशिक्षक होते, तेव्हा अनायाला विराटशी अनेकदा भेटण्याची संधी मिळाली होती.