Rahul sadolikar
अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचा 'जब वी मेट' खूपच चालला आणि याच चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चाही चालल्या.
करीना आणि शाहिदच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरू असताना अमृताची एन्ट्री झाली आणि करीना आणि शाहिदच्या प्रेमात मीठाचा खडा पडला अशी चर्चा सुरू झाली.
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत शाहिदने अमृतासोबतच्या अफेअरच्या बातम्या फेक रिपोर्ट्स असल्याचं सांगितलं. तो म्हणाला होता की ती त्याची खूप चांगली मैत्रीण आहे.
शाहिद कपूरने सांगितले होते की, अमृतासोबत तो अनेकदा एकत्र चित्रपट पाहायला जायचा. पण एकदा मल्टिप्लेक्सच्या बाहेर 20 कॅमेरामन त्याला कव्हर करण्यासाठी थिएटरबाहेर रांगेत उभे होते.
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या ब्रेकअपसाठी लोक अमृता रावला जबाबदार धरू लागले. या गॉसिप्स वाचून अमृताला खूप राग आला.
माझ्यामुळे करीना आणि शाहिदचे ब्रेकअप झाले. मला नेहमीच या विषयावर मौन पाळणे योग्य वाटले कारण सत्य एक ना एक दिवस स्वतःच बाहेर येईल.
शाहिद कपूर सध्या ब्लडी डॅडी या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे