Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्य समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोक पुन्हा नैसर्गिक उपायांकडे वळताना दिसत आहेत.
आयुर्वेद या पारंपरिक उपचार पद्धतीत अनेक औषधी वनस्पती आणि फळे प्रभावी मानली जातात, त्यापैकीच एक महत्त्वाचे फळ म्हणजे आवळा.
आंबट-गोड चवीचा हा आवळा आरोग्यासाठी एखाद्या अमृतासमानच आहे.
आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष शरीराचे आधारस्तंभ मानले जातात. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स या तिन्ही दोषांचे संतुलन राखण्यास मदत करतात.
आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात, ज्यामुळे पेशींवर होणारे अकाली वृद्धत्व टाळले जाते.
आवळा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे. तो मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतो, मेंदूचे कार्य सुधारतो, एकाग्रता वाढवतो आणि तणाव कमी करतो.