Akshay Nirmale
अल्लू अर्जूनच्या पुष्पा या चित्रपट चांगलाच गाजला. आता त्याच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. यातील आयटम साँग कोण करणार याची चर्चा सुरू झाली आहे.
पुष्पा चित्रपटातील अभिनेत्री समंथाचे आयटम साँग गाजले होते. त्यानंतर आता पुष्पा 2 मधील आयटम साँगसाठी अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) हीला संपर्क साधला गेला होता, अशी माहिती आहे.
श्रीलीला ही जन्माने अमेरिकन असलेली भारतीय मूळाची अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने कन्नड चित्रपटांतून काम केले आहे. तसेच काही तेलगू, तमिळ सिनेमांतही काम केले आहे.
तथापि, पुष्पा 2 मधील आयटम साँगसाठी श्रीलीलाने नकार दिल्याचे सांगितले जात आहे.
श्रीलीला हीला सध्या मुख्य अभिनेत्री म्हणून स्वतःला प्रस्थापित करायची इच्छा आहे. त्यामुळे ती या आयटम साँगला नकार देत आहे.
सध्या श्रीलीलाच्या हातात अनेक प्रोजेक्ट आहेत. 'किस' या चित्रपटातून तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात झाली होती.
तिचा पहिला चित्रपट 2019 मध्ये रीलीज झाला होता. तिचा जन्म 2001 चा आहे. सध्या ती केवळ 22 वर्षांची आहे.