Sameer Amunekar
पावसाळ्यात कोकणातील घाटांमध्ये पसरलेले दाट धुके एखाद्या स्वप्नवत जगाचा अनुभव देते. घाटमाथ्यावरून ढगांच्या गर्दीतून प्रवास करणे हा एक थरारक अनुभव असतो.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या घाटांमध्ये पावसाच्या आगमनानंतर चहुबाजूंनी हिरवळ पसरते. डोंगररांगांवर पसरलेले मखमली गालिचे डोळ्यांचे पारणे फेडतात.
घाटाच्या वळणावळणावर उगम पावणारे आणि डोंगरावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे निसर्गप्रेमींचे मुख्य आकर्षण असतात. हे धबधबे कोकणाच्या सौंदर्यात भर टाकतात.
घाटातील अरुंद आणि नागमोडी वळणे चालवणाराला (Driver) सतर्क ठेवतात, तर प्रवाशाला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात. प्रत्येक वळणावर बदलणारे दृश्य मंत्रमुग्ध करणारे असते.
घाटातील शुद्ध हवा आणि त्यावर होणारी रिमझिम पावसाची साथ मन शांत करते. शहरातील धकाधकीच्या जीवनातून सुटका करून घेण्यासाठी हे वातावरण अत्यंत सुखद असते.
तुम्ही जर फोटोग्राफीची आवड बाळगत असाल, तर कोकणातील घाट हे स्वर्गापेक्षा कमी नाहीत. इथली प्रकाश-सावलीची खेळ आणि निसर्गाचे बदलणारे रूप कॅमेऱ्यात टिपणे ही एक पर्वणीच असते.
कोकणच्या प्रवासात आंबोली, फोंडाघाट, कुंभार्ली आणि वरंध घाट यांसारख्या प्रसिद्ध घाटांना नक्की भेट द्या. या प्रत्येक घाटाची स्वतःची एक वेगळी ओळख आणि सौंदर्य आहे.