Amboli Ghat: घाट, धुकं अन् हिरवाई... निसर्गाचा थरार अनुभवायचा आहे? कोकणातलं आंबोली आहे परफेक्ट!

Sameer Amunekar

धुक्याची चादर अन् हिरवाईचा साज

पावसाळ्यात आंबोली घाट धुक्याच्या चादरीने झाकला जातो. चारही बाजूंना दिसणारी दाट हिरवाई मन मोहून टाकते.

Amboli Ghat Monsoon | Dainik Gomantak

आंबोली धबधब्यांचा भन्नाट अनुभव

पावसाळ्यात घाटातील असंख्य छोटे-मोठे धबधबे जिवंत होतात. कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि निसर्गरम्य दृश्यं अनुभवण्यासारखी असतात.

Amboli Ghat Monsoon | Dainik Gomantak

नागमोडी घाटरस्ता अन् भन्नाट दृश्यं

आंबोलीचा नागमोडी घाटरस्ता प्रवासात रोमांच वाढवतो. वाटेत मिळणारे हिरवेगार डोंगर आणि धुक्यात हरवलेले रस्ते खास आकर्षण ठरतात.

Amboli Ghat Monsoon | Dainik Gomantak

हिरण्यकेशी परिसराची भुरळ

हिरण्यकेशी परिसरातील शांत वातावरण आणि निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात या परिसराचं रूप आणखी खुलतं.

Amboli Ghat Monsoon | Dainik Gomantak

निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

फोटोग्राफी आणि निसर्गाचा आनंद घेणाऱ्यांसाठी आंबोली म्हणजे पर्वणीच! धुकं, डोंगर, धबधबे आणि हिरवाई प्रत्येक क्षण खास बनवतात.

Amboli Ghat Monsoon | Dainik Gomantak

थंडगार वातावरणाची मजा

पावसाळ्यात आंबोलीचं वातावरण आल्हाददायक आणि थंडगार असतं. शहराच्या गोंगाटापासून दूर काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

Amboli Ghat Monsoon | Dainik Gomantak

विकेंड ट्रिपसाठी एकदम परफेक्ट!

मित्र, कुटुंब किंवा जोडीदारासोबत छोट्या ट्रिपचा प्लॅन असेल, तर आंबोली घाट नक्कीच यादीत ठेवा. निसर्गाचा थरार आणि पावसाळ्याची मजा इथे एकाच ठिकाणी अनुभवता येते.

Amboli Ghat Monsoon | Dainik Gomantak

चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक हवी? हे भन्नाट कॉम्बिनेशन ट्राय करा

येथे क्लिक करा