Akshata Chhatre
गोव्यातील किल्ल्यांचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर आग्वाद आणि रेईश मागोस हेच उभे राहतात.
उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील हळर्ण गावात एक असा ऐतिहासिक किल्ला आहे, जो फारसा चर्चेत नसला तरी त्याचे महत्त्व मोठे आहे.
शापोरा नदीच्या किनारी वसलेला हा किल्ला शांतता, निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचा एक दुर्मिळ संगम आहे.
सतराव्या शतकात हा किल्ला सावंतवाडीच्या भोसल्यांनी बांधला होता.
पेडणे, माणेरी आणि डिचोली या आपल्या प्रदेशांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली.
हा किल्ला गोव्याच्या सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो.
हळर्ण किल्ला 'हळर्ण फोर्ट' किंवा 'फोर्ट सांता क्रूझ डी हळर्ण' या नावांनीही ओळखले जाते.