ICC Awards वर मोहर उमटवणारे क्रिकेटर

Pranali Kodre

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच 2022 वर्षातील पुरस्कार विजेत्या खेळाडूंची घोषणा केली आहे.

ICC Awards 2022 | Dainik Gomantak

काही दिवसांपूर्वीच आयसीसीने 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंना विविध प्रकारातील पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली होती.

Ben Stokes | Dainik Gomantak

त्यानंतर आता एकूण 13 पुरस्कार विजेत्यांची घोषणा आयसीसीने केली.

Babar Azam | Dainik Gomantak

आयसीसीने जाहीर केल्याप्रमाणे 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी पुरस्कार पाकिस्तानच्या बाबर आझमला मिळाला.

Babar Azam | Dainik Gomantak

तसेच 2022 वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रेचल हेहोय फ्लिंट ट्रॉफी इंग्लंडच्या नॅट स्किव्हरने जिंकली.

Nat Sciver | Dainik Gomantak

सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू 2022 पुरस्कार इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला जाहीर झाला.

Ben Stokes | Dainik Gomantak

सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटू 2022 पुरस्कार बाबर आझमलाच मिळाला.

Babar Azam | Dainik Gomantak

तर सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू 2022 पुरस्कार नॅट स्किव्हरनेच पटकावला.

Nat Sciver | Dainik Gomantak

सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटू 2022 पुरस्कारासाठी भारताच्या सूर्यकुमार यादवची निवड झाली.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

तसेच सर्वोत्तम महिला टी20 क्रिकेटपटू 2022 पुरस्कारासाठी ताहलिया मॅकग्राची निवड झाली.

Tahlia McGrath | Dainik Gomantak

त्याचबरोबर सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू 2022 पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सिनला मिळाला.

Marco Jansen | Dainik Gomantak

भारताच्या रेणूका सिंगने सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू 2022 पुरस्कार पटकावला.

Renuka Singh | Dainik Gomantak

याशियाव आयसीसीच्या सहसदस्य असलेल्या संघांमधील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 2022 पुरस्कार नामिबियाच्या गेहार्ड इरॅसमसला मिळाला.

Gerhard Erasmus | Dainik Gomantak

तसेच आयसीसीच्या सहसदस्य संघांमधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 2022 पुरस्कार युएईच्या ईशा ओझाला मिळाला.

Esha Oza | Dainik Gomantak

याचबरोबर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी 2022 मधील सर्वोत्तम पंच पुरस्कार जिंकला.

Richard Illingworth | Dainik Gomantak

साल 2022 मधील खिलाडूवृत्तीच्या पुरस्कारासाठी नेपाळच्या असिफ शेखची निवड झाली.

Aasif Sheikh | Dainik Gomantak
Axar Patel Wedding | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी