Manish Jadhav
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी त्याच्या फिनिशिंगसाठी ओळखला जात होता. यातच, पाकिस्तानच्या महिला संघात आलिया रियाझही फिनिशिंगसाठी ओळखली जातेय.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघ सध्या 3 सामन्यांच्या T20I मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचे यजमानपद भूषवत आहे.
या मालिकेतील पहिले दोन सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. आलियाने या दोन्ही सामन्यात शानदार प्रदर्शन केले.
टी-20 सामन्यातील उत्कृष्ठ प्रदर्शनामुळे पाकिस्तानात आलियाच्याचं नावाची चर्चा सुरु आहे.
आलिया रियाझने शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानला जिंकून दिला. त्याचवेळी, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिने षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
आलिया रियाझची तुलना महेंद्रसिंग धोनीशी केली जात आहे. माहीसारखी ती ही छक्का मारुन सामना जिंकून देतेय.
30 वर्षीय आलिया रियाझचा जन्म 24 सप्टेंबर 1992 रोजी रावळपिंडीमध्ये झाला. आलिया आपल्या शानदार फलंदाजीसोबतच 'ऑफ स्पिनर' म्हणूनही ओळखली जाते.
आलिया रियाझने 53 एकदिवसीय सामन्यात 985 धावा केल्या आहेत, तर 8 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर आलिया रियाझने 74 टी-20 सामन्यात 843 धावा केल्या आहेत. तर 17 विकेट्स घेतल्या आहेत. आलियाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत 7 अर्धशतके ठोकली आहेत.