Akshay Nirmale
विश्वाचा आकार इतका मोठा आहे की, यात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह असू शकतो, याची दाट शक्यता आहे. त्यातूनच एलियन्स किंवा परग्रहवासींबाबत एक आकर्षण जगभरातील लोकांमध्ये आहे.
एलियन्सनी पृथ्वीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर कसे द्यायचे, यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने A Sign in Space नावाचा एक प्रोजेक्ट चालवला जात आहे.
नुकतेच शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावरून पृथ्वीवर एक संदेश पाठवला आहे. ESA ने त्यांच्या ExoMars Trace Gas Orbiter द्वारे 24 मे रोजी रात्री 9 वाजता पृथ्वीवर मेसेज पृथ्वीवर पाठवला.
मंगळावरून पाठवला गेलेला हा संदेश पृथ्वीवर यायला 16 मिनिटे लागली.
आता या मेसेजला डीकोड करून त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ईएसए करत आहे. त्यातून भविष्यात एलियन्सच्या मेसेजला रिप्लाय देण्याची तयारी केली जात आहे.
सर्व देशातील एक्सपर्ट्सना हा मेसेज डिकोड करण्यास सांगितले आहे. या मेसेजमध्ये काय लिहिले आहे याची माहिती ईएसएला आहे. पण त्याबाबत गुप्तता पाळली गेली आहे.
मेसेज क्रॅक करणाऱ्यांना त्यांची उत्तरे ईएसएकडे सोपविण्यास सांगितली आहेत. जर खरंच, एलियन्सनी मेसेज पाठवला तर पृथ्वीवरील लोकांना तो डिकोड करता आला पाहिजे, हा त्यामागील उद्देश आहे.