Akshata Chhatre
आदित्य धर दिग्दर्शित नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.
चित्रपटातील दमदार ॲक्शन, डायलॉग्स आणि थ्रिलर सीन्ससोबतच रणवीर सिंहने चालवलेल्या रोडस्टर बाइकनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चित्रपटात अनेक सीन्समध्ये सिल्व्हर मॅटेल ग्रे रंगाची ही शार्प लूक असलेली बाइक रणवीर (हमजा अली मजारी) चालवताना दिसतो.
ही बाइक त्याला रहमान डकैत (अक्षय खन्ना) खुश होऊन भेट देतो.
पडद्यावर रणवीर जेव्हा या बाइकवरून पडदा काढतो, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो.
ही बाइक नेमकी कोणती आहे हे स्पष्ट झालेले नसले तरी, ती रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 चा खास स्क्रॅम्बलर व्हर्जन असू शकते, जी खास चित्रपटासाठी मॉडिफाय करण्यात आली आहे.
'धुरंधर'मध्ये ही बाइक केवळ एक वाहन नसून, ती रणवीरच्या निर्भीड राइडिंग स्टाईल आणि दमदार व्यक्तिमत्त्वाला अधिक उठाव देते.