Pranali Kodre
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेलने गेल्या काही दिवसात चांगली कामगिरी केली आहे.
पण अक्षरच्या नावाच्या स्पेलिंगमुळे अनेक जण गोंधळात पडलेले दिसतात.
अक्षरच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर Akshar असे स्पेलिंग आहे, तर सामन्यावेळी आणि अन्य ठिकाणी त्याचे Axar असे स्पेलिंग लिहिलेले दिसते.
त्याच्या नावाच्या स्पेलिंग मागे एक गमतीशीर किस्सा आहे, याबद्दल त्यानेच खुलासा केला होता.
झालं असं की...
झाले असे की अंडर-19 वर्ल्डकपलाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी त्याला पासपोर्टची गरज होती.
दाखल्याची गरज
त्यामुळे पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याला लायसन्स किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची गरज होती.
तो त्यावेळी 17 वर्षांचाच असल्याने त्याच्याकडे लायसन्स नव्हते, म्हणून तो दाखला घेण्यासाठी गेला.
त्यावेळी त्याच्या शाळेच्या मुख्यध्यापकांनी चुकून त्याचे स्पेलिंग Axar असे लिहिले.
त्याच कारणाने त्याच्या पासपोर्टवरही Axar असे नाव छापून आले.
Axar नावचं कायम
त्यानंतर त्याने आणखी गोष्टी किचकट न करण्यासाठी काही बदल केले नाहीत आणि Axar हेच स्पेलिंग कायम केले.
त्यामुळे अधिकृतरित्या त्याचे स्पेलिंग Axar असे लिहिले जाते.