Ajinkya Rahane चे टीम इंडियात कमबॅक

Pranali Kodre

बीसीसीआयने 25 एप्रिल रोजी 7 जूनपासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 फायनलसाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली.

Ajinkya Rahane | Twitter

या फायनलसाठी भारतीय संघात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेलाही संधी मिळाली आहे.

Ajinkya Rahane | Twitter

रहाणेचे भारतीय संघात तब्बल 15 महिन्यांनंतर पुनरागमन झाले आहे.

Ajinkya Rahane | Twitter

रहाणे भारताकडून अखेरचा कसोटी सामना 11 ते 14 जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याच्या खराब फॉर्ममुळे आणि दुखापतीमुळे त्याला भारतीय संघातून त्याची जागा गमवावी लागली होती.

Ajinkya Rahane | Twitter

पण आता रहाणेने नजीकच्या काळात रणजी ट्रॉफी आणि आयपीएल 2023 केलेल्या कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले असून त्याने पुन्हा भारतीय संघात जागा मिळवली आहे.

Ajinkya Rahane | Twitter

रहाणेने डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान पार पडलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेत मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने या रणजी स्पर्धेत 7 सामन्यांमध्ये 57.63 च्या सरासरीने 634 धावा केल्या होत्या.

Ajinkya Rahane | Twitter

तसेच रहाणे आयपीएल 2023 मध्येची चेन्नई सुपर किंग्सकडून दमदार कामगिरी करत आहे.

Ajinkya Rahane | Twitter

त्याने आयपीएल 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून 52.25 च्या सरासरीने आणि 199.04 च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

Ajinkya Rahane | Twitter
Sachin Tendulkar Stand | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी