Pranali Kodre
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया संघात इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर होत आहे.
या अंतिम सामन्यात भारताच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली.
रहाणेने पहिल्या डावात 129 चेंडूत 89 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचे नाव कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
रहाणे कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यात 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी साल 2021 मध्ये भारताने पहिला कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना खेळला होता. पण त्यावेळी एकाही भारतीय खेळाडूला अर्धशतक करता आले नव्हते. त्यावेळीही रहाणेने पहिल्या डावात 49 धावा केल्या होत्या.
दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रहाणेनंतर भारताकडून पहिल्या डावात शार्दुल ठाकूरनेही 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रहाणेने या अंतिम सामन्यातून तब्बल 512 दिवसांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले होते. तो अखेरचा सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता.
रहाणेने या अंतिम सामन्यादरम्यान कसोटी कारकिर्दीत 5000 धावांचा टप्पाही पार केला.