Akshata Chhatre
तुम्ही कधी विमानात इंटरनेट वापरलं आहे का?
नक्कीच नाही, कारण विमानात बसल्या-बसल्या आपल्याला एअरप्लेन मोड ऑन करावा लागतो.
पण आज देशभरातील विमान प्रवाशांसाठी आनंदवार्ता समोर आलीये.
कारण आता आपल्या देशातील विमानसेवा इंटरनेट देखील देणार आहे.
हो!! तुम्ही बरोबर वाचताय. तुम्हाला एअरप्लेनमध्ये सोशल मीडिया, ई-मेल आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायला मिळतील.
एअर इंडिया देशी आणि विदेशी प्रवासादरम्यान इंटरनेटची सेवा देणार आहे.
आणि भारतातून अशी कामगिरी करणारी एअर इंडिया पहिली विमान कंपनी ठरली आहे.