रेखा की मार्गो रॉबी? तुम्हाला कोणती 'बार्बी' आवडली?

Akshay Nirmale

सदाबहार डिवा

सदाबहार आणि दिग्गज बॉलीवूड डिवा अभिनेत्री रेखाने अलीकडच्याच काळात 'व्होग अरेबिया'साठी केलेल्या फोटोशूटने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

rekha | google image

एआय ने केली कमाल

या फोटोशुटनंतर सोशल मीडियात रेखाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे फोटोज बनविण्याची गरज व्यक्त केली होती. ई-शॉपिंग प्लॅटफॉर्म मिंत्रा ने हे आव्हान स्विकारले.

Rekha As Barbie by AI | Instagram

फोटो व्हायरल

मिंत्राने अभिनेत्री रेखा यांना एआय च्या मदतीने बार्बीच्या रूपात साकारले. रेखाचा हा लुक सर्वांना आवडला. गेल्या काही दिवसांत रेखाचे हे बार्बी या बाहुलीच्या रूपातील फोटो व्हायरल झाले आहेत.

Rekha As Barbie by AI | Instagram

जगप्रसिद्ध बाहुली

बार्बी ही जगप्रसिद्ध बाहुली आहे. 64 वर्षांपुर्वी 9 मार्च 1959 मध्ये बार्बी ही बाहुली पहिल्यांदा बाजारात आली होती. तेव्हापासून खेळण्यांच्या उद्योगात बार्बी गेमचेंजर ठरली होती.

Rekha As Barbie by AI | Instagram

बार्बी चित्रपट

दरम्यान, एकीकडे रेखाचा हा लूक व्हायरल होत असताना हॉलीवूड अभिनेत्री मार्गो रॉबी (Margot Robbie) चा 'बार्बी' हा चित्रपट 21 जुलै 2023 रोजी रीलीज झाला आहे.

Margot Robbie | Instagram

बाहुली जेव्हा जिवंत होते...

ग्रेटा गर्विग दिग्दर्शित या चित्रपटात मार्गो रॉबीने बार्बीची भूमिका साकारली आहे. यात अभिनेता रायन गॉसलिंगने केनची भूमिका साकारली आहे. चित्रपटात हे दोघे प्रत्यक्ष दुनियेत येतात, असे दाखवले आहे.

Barbie Doll | google image

मार्गो रॉबी आणि रेखा

दरम्यान, मार्गो रॉबीपेक्षा रेखाच बार्बीच्या रूपात जास्त चांगली दिसत असल्याचे मत अनेकजण व्यक्त करताहेत.

Margot Robbie | Instagram
Ratan tata and goa | Dainik Gomantak