Akshata Chhatre
ऑफिसमधील कामादरम्यान दुपारचा जेवण ब्रेक हा एक दिलासादायक क्षण असतो, पण जेवणानंतर लगेचच तुम्हाला खूप झोप येत असेल आणि कामात लक्ष लागत नसेल, तर तुम्ही एकटे नाही आहात.
ही एक सामान्य समस्या आहे, जिला 'पोस्ट लंच डिप' म्हणतात.
याचे मुख्य कारण म्हणजे पचनक्रियेत शरीराची जास्त ऊर्जा वापरली जाते, ज्यामुळे मेंदूला कमी ऊर्जा मिळते आणि सुस्ती जाणवते. काही सोप्या सवयींचा अवलंब करून या दुपारच्या झोपेवर मात करता येते आणि तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह आणि फ्रेश राहू शकता.
दुपारच्या जेवणामध्ये जास्त तेलकट, जड किंवा गोड पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी, प्रोटीन, फायबर आणि भाज्यांनी समृद्ध असा हलका आहार घ्या.
घाईघाईत आणि जास्त खाल्ल्याने पचनसंस्थेवर दबाव येतो, ज्यामुळे झोप येऊ शकते. त्यामुळे अन्न चांगल्या प्रकारे चावून खा आणि मर्यादित प्रमाणातच जेवण करा.
जेवणानंतर ५ ते १० मिनिटे फिरल्याने शरीर ॲक्टिव्ह होते आणि पचनक्रिया देखील सुधारते.
डिहायड्रेशन हे देखील थकव्याचे एक मोठे कारण असू शकते. त्यामुळे दिवसभर नियमित अंतराने पाणी पीत रहा.