Akshata Chhatre
दुपारी जेवणानंतर लागलीच मस्त डुलकी घेणं हे खूप सुखद वाटतं पण हीच सवय आपल्या शरीराला हळूहळू नुकसान करू शकते, हे अनेकांना माहिती नसतं.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न व्यवस्थित खाली सरकत नाही.पचन, वजन, मानसिक स्वास्थ्य आणि हृदयाच्या दृष्टीने ही सवय किती धोकादायक ठरू शकते.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न व्यवस्थित खाली सरकत नाही. अन्न निचरा न होता वर येतं, त्यामुळे गॅस, छातीत जळजळ, ढेकर, पोट फुगणे यासारख्या समस्या वाढतात.
जेवल्यानंतर शरीरात मिळालेली उर्जा वापरली जात नाही, ती साठवली जाते. ही साठवलेली ऊर्जा चरबीच्या रूपात पोटावर आणि शरीरावर साचते. पोटाचा घेर वाढतो, वजन वाढतं, आणि त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा धोका वाढतो.
दुपारी लगेच झोपल्याने रात्रीची झोप हलकी होते किंवा झोपच लागत नाही. परिणामी दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव जाणवतो.मेंदूला पुरेसा आराम न मिळाल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्याची लक्षणे दिसू शकतात.
जेवणानंतर लगेच झोपल्याने इन्सुलिनची प्रक्रिया योग्य होत नाही. शरीर रक्तातील साखरेवर योग्य नियंत्रण ठेवू शकत नाही. हळूहळू इन्सुलिन रेसिस्टन्स वाढते आणि Type 2 डायबेटिसचा धोका वाढतो.