12 वर्षातून एकदा होणारी कणकुंबी श्री माऊलीची यात्रा

Pramod Yadav

गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक अनुबंधाचे प्रतिक असलेली प्रसिद्ध श्री माऊली देवीच्या भेटीचा अलौकिक सोहळा पार पडला.

Kankumbi Temple | Twitter

परंपरेप्रमाणे ही जत्रा बारा वर्षांनंतर होत असते. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने यंदा तब्बल 14 वर्षांनी ही जत्रा संपन्न झाली.

Kankumbi Temple | Twitter

श्री माऊली देवी जत्रोत्सव हा गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांचे एकमेकांशी असलेली सांस्कृतिक तसेच अनुबंध दर्शवितो.

Kankumbi Temple | Twitter

आख्यायिकेनुसार, सात माऊली देवींच्या बहिणींच्या भेटीचा सोहळा दर बारा वर्षांनी होतो.

Kankumbi Temple | Twitter

बारा वर्षांनी गुरू जेव्हा मकर राशीत येतो, त्यावेळी कणकुंबी व चिगुळे येथील श्री माऊली देवीच्या तीर्थकुंडातील पाणी एक ते दोन फूट वर येते.

Kankumbi Temple | Twitter

त्यावेळी ते पाणी पांढरे शुभ्र दुधाप्रमाणे होते. या पर्वणीला गंगा भगीरथी अवतरली, असे समजून बारा वर्षांनी या सर्व भगिनींच्या म्हणजे माऊलींच्या भेटीचा सोहळा रंगतो.

Kankumbi Temple | Twitter

देशभरातील भक्तांनी हा दैदिप्यमान सोहळा पाहणीसाठी अलोट गर्दी केली होती.

Kankumbi Temple | Twitter
आणखी पाहण्यासाठी