Akshay Nirmale
शाहरूख खानच्या जवान मधून नयनतारा बॉलीवूड पदार्पण करत आहे. त्यानंतर आणखी एक दाक्षिणात्य अभिनेत्री, मॉडेल आकांक्षा शर्मा (Akanksha Sharma) ही बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.
'आशिकी 3' या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत आकांक्षा दिसणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसात निर्मात्यांसोबत तिच्या अनेक मीटिंग्ज झाल्या आहेत.
तथापि, अद्याप निर्मात्यांनी 'आशिकी 3' मध्ये कोण दिसणार याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
निर्मात्यांना आशिकी चित्रपटाची हीरोईन म्हणून एका नव्या चेहऱ्याची गरज आहे. त्यामुळेही आकांक्षा हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे.
'आशिकी' फ्रँचायजीमध्ये नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. पूर्वी राहुल रॉय आणि अनु अगरवाल तर नंतर श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांना संधी मिळाली होती.
आकांक्षा शर्मा यापुर्वी टायगर श्रॉफसोबत कॅसानोव्हा या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
आकांक्षाने यापुर्वी साऊथमध्ये त्रिविक्रम हा एक चित्रपट केला आहे. साऊथमध्ये तिचे इतरही काही चित्रपट येण्याची शक्यता आहे.