लॉकडाऊनमध्ये बॉयफ्रेंडसोबत 8 महिने गोव्यात राहिली 'ही' अभिनेत्री; आता लग्नासाठी गोव्यालाच पसंती...

Akshay Nirmale

श्रीजिता आणि मायकल

टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डे ही मायकल ब्लॉहम पेप याच्याशी पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे. मायकल एका शिपिंग कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर आहे.

Sreejita De | facebook

पहिली भेट आणि एंगेजमेंट

2019 मध्ये दोघांची एका पार्टीत पहिली भेट झाली होती. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये या दोघांनी एंगेजमेंट केली होती.

Sreejita De | facebook

जर्मनीत केले लग्न

त्यानंत दोघांनी जर्मनीत याच वर्षी जुलैमध्ये ख्रिश्चन स्टाईलने लग्न केले होते. दोघांच्या कुटूंबांना दोघांकडील परंपरा कळाव्यात यासाठी आता भारतीय पद्धतीने लग्न करत आहोत, असे श्रीजिता म्हणते.

Sreejita De | facebook

आता बंगाली पद्धतीने लग्न

श्रीजिता यावेळी बंगाली परंरपेनुसार लग्न करणार आहे. या टिपिकल बंगाली लग्नासाठीचे नियोजनही सुरू झाले आहे. यात मेहंदी, संगीत, हळद असे सर्व कार्यक्रम होणार आहेत.

Sreejita De | facebook

नवीन वर्षात लग्न

नोव्हेंबरच्या सुरवातीला आम्ही लग्नाचे प्लॅनिंग केले होते. पण काही कमिटमेंट्समुळे आता नवीन वर्षात जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आम्ही गोव्यात लग्न करू, असे श्रीजिताने म्हटले आहे.

Sreejita De | facebook

गोवा का निवडला?

आम्हा दोघांनाही बीच खूप आवडतात. गोवा हे आम्हा दोघांच्याही आवडीचे ठिकाण आहे. घरातले कोलकातासाठी आग्रह धरत असतानाही लग्नासाठी गोव्याची निवड केली.

Sreejita De | facebook

गोव्याच्या प्रेमात...

मी आणि मायकल लॉकडाऊन काळात तब्बल 8 महिने गोव्यात राहिलो होतो. त्यामुळे आम्ही गोव्याच्या प्रेमात पडलो आहोत, असे श्रीजिताने सांगितले.

Sreejita De | facebook
Goan Fish Curry | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...