Pramod Yadav
बिग बॉस ओटीटी कन्नड फेम स्पर्धक सोनू गौडा अनेकदा इंस्टाग्राम पोस्ट्सद्वारे लक्ष वेधून घेते.
सोनू एक अभिनेत्री तर आहेच शिवाय सोशल मीडियावर ती खूप लोकप्रिय आहे.
सोनू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या नवनव्या पोस्टना हजारो लाईक्स मिळत असतात.
अलिकडेच सोनूने गोव्याला भेट दिली, गोव्यातून तिने शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
सोनूने उत्तर गोव्यातील बागा बीचला भेट दिली. बीचवर तिने काढलेले फोटो चाहत्यांना चांगलेच पसंत पडत आहेत.
पिंक टीशर्ट आणि जिन्स शॉर्टमध्ये सोनू खूपच हॉट दिसत आहे.
सोनूने बीचवरील फोटोसहीत सीफूडचे देखील फोटो शेअर केले आहेत. तिने गोव्यातील स्वादिष्ट सीफूडवर देखील ताव मारला.
सोनूचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटीझनच्या पसंतीस उतरत आहेत.