Akshay Nirmale
अभिनेत्री शहनाझ गिल (Shehnaz Kaur Gill) ने स्वतःच्या स्टाईलने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बिग बॉस पासूनचा तिचा प्रवास आता चित्रपटांपर्यंत आला आहे.
शहनाझ यापुर्वी सलमानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसली होती.
आता ती थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. यात भूमी पेडणेकरही प्रमुख भूमिकेत आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशन करत असतानाच शहनाझला फूड पॉयझनिंग झाले आहे. तिला कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे.
आता तिने फॅन्ससाठी व्हिडिओ जारी केला आहे. तिने इन्स्टा लाईव्ह सेशनमधून स्वतःच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
शहनाझ हीने पंजाबी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. ती उत्तम गायिकाही आहे.
शहनाझची एकूण संपत्ती 35 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.