Pramod Yadav
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या चित्रपटांपासून लांब असली तरी, सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते.
समीरा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन विविध स्वरुपाचे व्हिडिओ शेअर करत असते. अलिकडे तिने गोव्यातील तिच्या आवडीचे पाच पदार्थ शेअर केले आहेत.
गोव्यातील एक प्रसिद्ध स्ट्रिट फूड म्हणून रॉस ऑम्लेट ओळखले जाते. यात चिकन किंवा मटण असते आणि गोवन पावसोबत खाता येते.
कटलेट ब्रेड हा रवा, मटण आणि भाजी यापासून बनवलेला एक गोवन पाव आहे.
भाजी पाव प्रत्येक गोवेकराचा आवडीचा नाष्टा आहे. विविध प्रकारची आणि पावासोबत खाल्ली जाते.
चिकन कॅफ्रेल गोव्यातील एक प्रसिद्ध डिश आहे. चिकनला विशिष्ट कॅफ्रेल मसाल्यात पेस्ट टाकून तयार केली जाते.
समीराच्या लिस्टमधील अखेरचा पदार्थ आहे तो म्हणजे कालवा ग्रेव्ही. शिंपल्यांपासून बनवला जाणारा हा पदार्थ पावासोबत खाल्ला जातो.