गोमन्तक डिजिटल टीम
मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने अलिकडेच 'प्राजक्तराज' नावाचा एक ज्वेलरी ब्रॅन्ड सुरू केला आहे.
प्राजक्ता नेहमीच तिच्या ब्रॅन्डचे प्रमोशन करत असते. अलिकडेच तिने याबबत एक पोस्ट केलीय.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण. गुंतवणूकीसाठी उत्तम काळ, अशी बातमी बघितली.
मग पटकन प्राजक्त राजच्या “तुळजा कलेक्शन (सोन्याचे अलंकार) मधील photos post करायला घेतले.
मी पुढचं काही लिहीण्याची आवश्यकता नाही… हो ना?
अशी पोस्ट करत प्राजक्ताने तिच्या ब्रॅन्डचे प्रमोशन केले आहे.
प्राजक्ताने स्वत: ते दागिने परिधान करून त्याचे प्रमोशन केले आहे.