Pramod Yadav
'कभी खुशी कभी गम' चित्रपटाची अभिनेत्री मालविका राज नुकतेच विवाहबद्ध झाली आहे.
अभिनेत्रीने प्रियकर प्रणव बग्गासोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले आहे.
या शाही लग्नात मालविका आणि प्रणव यांनी सोनेरी रंगाची पोशाख परिधान केला होता.
दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लग्नाच्या फोटोंमध्ये हे दोन्ही स्टार्स खूप आनंदी दिसत आहेत.
आमचे हृदय प्रेमाने भरुन आले आहे, असे लग्नाचे फोटो शेअर करताना मालविकाने कॅप्शन लिहिले आहे,
जोडप्यावर त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.