Akshay Nirmale
प्रसिद्ध अभिनेत्री मालविका राज हीने नुकतेच गोव्यात तिच्या प्रियकराशी लग्न केले.
'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात मालविकाने करीना कपुरची बालपणीची भूमिका साकारली होती.
29 नोव्हेंबर रोजी गोव्यात मालविकाने तिचा प्रियकर प्रणव बग्गा याच्यासोबत सात फेरे घेतले. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
या खास प्रसंगी मालविकाने हेवी गोल्डन कलरचा लेहेंगा परिधान केला होता. तर प्रणव बग्गानेही मॅचिंग शेरवारी परिधान केली होती.
सोशल मीडियात टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी या जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मंगळवारी या जोडप्याचा हळदी आणि मेहंदी सोहळा पार पडला होता.
ऑगस्ट महिन्यात या कपलने तुर्कीतील कॅपाडोशिया येथे एंगेजमेंट केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी दोघांनी लग्न केले.