Akshay Nirmale
नुकतेच अभिनेत्री भुमी पेडणेकरने तिचा ब्राईडमेड लुक इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
या लुकमध्ये तिने लाईट ब्ल्यू कलरचा लहंगा परिधान केला आहे.
या लुकवर तिने सॉफ्ट ग्लॅम मेकअप कॅरी केला होता.
भुमीने कुंदन चोकर प्रकारातील ज्वेलरी परिधान केली होती, तिने हातात कुंदन हातफुलही घातले होते.
भुमीच्या या फोटोजना इन्स्टाग्रामवर चाहत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.
भुमी तिच्या विविध लुकमधील, विविध ड्रेसेसमधील फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
भुमीच्या कामाबद्दल बोलायचे तर ती आगामी काळात 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटात विकी कौशल आणि कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे.