अमेरिकन बॉक्स ऑफिसवर थलपतीचा 'विजय'; शाहरूख, रजनीकांतला टाकले मागे...

Akshay Nirmale

जगभर फॅन फॉलोविंग

सिनेरसिकांनी थलपती नाव दिलेला अभिनेता विजय (Vijay) आता वर्ल्डवाईड ओळखला जाणारा भारतीय सुपरस्टार आहे. विजयला जगभरातून मोठी फॅन फॉलोविंग लाभली आहे.

Thalapathy Vijay | google image

थलैवा, किंग खान आणि थलपती

थलपती विजय याचा 'Leo' या चित्रपटाने अमेरिकेत बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने रजनीकांतच्या 'जेलर' आणि शाहरूख खाच्या 'जवान'लाही मागे टाकले आहे.

Thalapathy Vijay | google image

अमेरिकेत जबर कमाई

यूएसए प्रीमियरमध्ये या चित्रपटाने तब्बल एक दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. लिओ हा अमेरिकन बॉक्स ऑफिसवर अशी कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. याआधी 'आरआरआर'ने ही अशी कमाई केली होती.

Thalapathy Vijay | google image

कमाईचा विक्रम

लोकेश कनगराज दिग्दर्शित लिओ 2023 मध्ये 1 मिलियन डॉलर्स कमावणारा पहिला चित्रपट ठरला आहे.

Thalapathy Vijay | google image

लिओला अमेरिकेत 1000 स्क्रीन्स

विशेष म्हणजे विजयचा लिओ हा चित्रपट अमेरिकेत 1000 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. तसेच तिकीटाची वाढती मागणी पाहता ती आणखी वाढवण्याची योजना आखली जात आहे.

Thalapathy Vijay | google image

युके, गल्फ मध्येही चर्चेत

यूके, गल्फ कंट्रीजमध्येही विजयच्या या चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच परदेशी बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीच लिओ 2023 चा सर्वात हिट तमिळ चित्रपट ठरला आहे.

Thalapathy Vijay | google image

अनेक भाषांत रीलीज

लिओ हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नडसह हिंदीतही 19 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या आधी विजयने लोकेश कनगराजसोबत 'मास्टर' हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे.

Thalapathy Vijay | google image
Goan Fish Curry | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...