Rahul sadolikar
वास्तववादी अभिनयाचा बादशाह म्हणुन ओळखले जाणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांचा आज 73 वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने पाहुया त्यांच्या अभिनयाचा प्रवास
20 जुलै 1950 रोजी उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात नसीरुद्दीन शाह यांचा जन्म झाला.
नसीरुद्दीन शाह चित्रपटांपेक्षा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात
झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत नसीरजींनी आमिर खानवर निशाणा साधला होता, त्याच मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन यांचीही खिल्ली उडवली होती.
सीएए आणि एनआरसीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नसीरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांना जोकर म्हटले होते.
नसीरजी म्हणाले होते जर मुघल साम्राज्य राक्षसी आणि विध्वंसक होते. त्यामुळे त्यांनी बांधलेला ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार पाडा.
नसीरुद्दीन शाह यांनी सिंधी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पाकिस्तानमध्ये आता सिंधी भाषा बोलली जात नसल्याचे म्हटले होते, यावर नसीरुद्दीन शाह यांच्यावर सोशल मीडियात बरीच टीका झाली