दैनिक गोमन्तक
चामड्याच्या वस्तू वापरणे अनेक लोकांना आवडते.
लेदरचे बेल्ट, पर्स आणि शूज लोकांना वापरायला खूप आवडतात.
मात्र लेदरच्या वस्तू खरेदी करत असलेले लेदर खरे आहे की बनावट हे समजले पाहिजे.
लेदर खरेदी करताना प्रथम पिनने टोचून बघा खऱ्या चामड्याला कधीच छिद्र पडत नाही आणि जरी असले तरी ते काही वेळात भरते.
अस्सल लेदरचा वास येतो जर वास नसेल तर तुमचे लेदर बनावट आहे.
खरे लेदर आतून नेहमीच खडबडीत असते. त्यावरुन समजते लेदर खरे आहे.
ओरिजनल लेदर हे अतिशय मऊ असते आणि बनावट लेदर त्यापेक्षा कमी सॉफ्ट असते.
खऱ्या लेदरला कधीही फार चांगले फिनिशिंग नसते आणि कधी जास्त चमकत नाही.
रिअल लेदर कधीच जळत नाही आणि जास्त वेळ आगीत ठेवल्यास त्याचा वास यायला लागतो.