Kavya Powar
वास्तूनुसार घर बांधताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. घरात कोणती गोष्ट कोणत्या दिशेला असायला हवी ते जाणून घेऊया
वास्तूनुसार उत्तर दिशा भगवान कुबेरची आहे. धनाच्या आगमनासाठी तिजोरी या दिशेला ठेवावी किंवा ही दिशा रिकामी ठेवावी.
घराची पूर्व दिशा रिकामी ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेचे स्वामी सूर्यदेव आणि इंद्रदेव आहेत.
वास्तु नियमानुसार जड वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असाव्यात. या दिशेला शौचालय नसावे.
तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय पश्चिम दिशेला असावे. पण लक्षात ठेवा की किचन आणि टॉयलेट एकमेकांच्या जवळ नसावेत.
ईशान्य ही घराची उत्तर-पूर्व दिशा आहे. वास्तूच्या नियमानुसार पूजा कक्ष या दिशेला असावा.
आग्नेय दिशा ही अग्नि तत्वाची दिशा आहे. या दिशेने गॅस आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असाव्यात.