Akshay Nirmale
१० फेब्रुवारीपर्यंत हा महासोमयाग चालणार आहे.
यज्ञस्थळी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
भाविक या महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत.
या महाप्रसादात पांढरा भात, आमटी, भाजी, शेवयांची खीर, पापड, लोणचे या जिन्नसांचा समावेश आहे.
उत्तम पाऊस होऊन, मुबलक धान्य मिळावे यासाठी महासोमयागमध्ये तीन दिवसात सहा वेळा प्रवर्ग्य विधीही केला जात आहे.
हवनकुंडाला परिक्रमा घालण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत आहेत.
सकारात्मक उर्जेसाठी आणि वातावरणशुद्धीसाठी या यज्ञाचे आयोजन केले गेले आहे.