Winter Care Tips: थंडीत मुळा खाण्याचे फायदेच फायदे, फायबर अन् अँटिऑक्सिडंट्सचा अस्सल खजिना

Manish Jadhav

पचनशक्तीचा सुपरहिरो

मुळ्यामध्ये असलेले फायबर (तंतू) पचनक्रिया सुधारतात. हिवाळ्यात होणाऱ्या बद्धकोष्ठतेपासून हा मुळा तुमचा बचाव करतो.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

थंडीतील संरक्षक कवच

मुळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी (Vitamin C) असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी, खोकला व फ्लूपासून संरक्षण मिळते.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात

मुळ्यातील पोटॅशियम रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करते, जे हिवाळ्यात अनेकदा वाढण्याची शक्यता असते.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

नैसर्गिक डिटॉक्सिफायर

मुळा यकृत (Liver) आणि किडनी साफ ठेवण्यास मदत करतो. शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

त्वचेला देईल चमक

मुळ्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि पाणी त्वचेला पोषण देतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यापासून वाचते आणि चमक टिकून राहते.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

वजन कमी करण्याचा मित्र

यात कॅलरी खूप कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवण्यास मदत होते.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

साखरेचे संतुलन

मुळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्याने, तो खाल्ल्याने रक्तातील साखर (Blood Sugar) अचानक वाढत नाही. मधुमेहींसाठी तो चांगला आहे.

Radish Health Benefits | Dainik Gomantak

सूज कमी करण्याचा गुणधर्म

मुळ्यामध्ये दाहक-विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील अंतर्गत सूज किंवा वेदना कमी करण्यास मदत मिळते.

Radish Health Benefits | Dainik Gomantak