गोमन्तक डिजिटल टीम
इडली हे आंबवलेल्या पदार्थापासून बनलेले असते. त्यामुळे ते पोटासाठी खूप फायदेशीर असते.
इडली बनवण्यासाठी तेल आणि मसाल्याची गरज नसल्यामुळे ते पचायला सोपे असते.
इडली हे फायबर युक्त पदार्थ असल्याने ते खल्यानंतर आपले पोट बराच वेळ भरलेला राहते. त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही.
इडलीमध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्सफॅट किंवा सॅच्युरेटेड फॅट नसते.
तुम्ही डाएटिंग करत असाल तरी देखील इडली प्रमाणात खाऊ शकता.
आहार आणि फिटनेसनुसार रवा, ओट्स, नाचणी किंवा मल्टीग्रेन इडलीदेखील बनवू शकता.
इडली हे वजन कमी करण्यासाठी अनुकूल आहार आहे. मात्र तुम्ही तुमच्या फिटनेस तज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता.
इडली खायला चविष्ट आणि मऊ असते. तुम्ही सहजपणे इडलीला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.