Akshata Chhatre
सदाफुलीचं झाड फक्त शोभेपुरतं मर्यादित नाही, तर त्याचे औषधी फायदेही आहेत चला जाणून घेऊया त्याचे ८ खास गुण.
सदाफुलीची पानं आणि फुलं मधुमेहावर आणि रक्तदाबावर नियंत्रणासाठी आयुर्वेदात वापरली जातात.
या फुलातून मिळणाऱ्या अर्काचा वापर काही संशोधनासाठी केला जात आहे.
सदाफुलीचे पानांमध्ये नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे हे झाड बागेतील इतर झाडांचं कीटकांपासून संरक्षण करतं.
ही वनस्पती खूप कमी पाण्यावर तग धरते, म्हणून कोरड्या हवामानातही सहज उगम पावते. हे फूल सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुललेले असल्यानेच त्याचं नाव 'सदाफुली' आहे.
वास्तुशास्त्रानुसार, सदाफुलीचे झाड घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं, आणि नकारात्मकता दूर ठेवतं.