Happy Relationship: सुखी संसाराचा 'सीक्रेट फॉर्म्युला'! नातं टिकवण्यासाठी प्रत्येक कपलने फॉलो कराव्या 'या' खास टीप्स

Manish Jadhav

मनापासून संवाद साधा

रोजच्या धावपळीतही एकमेकांशी मनमोकळेपणाने आणि थेट बोला. मनात गैरसमज ठेवण्यापेक्षा स्पष्ट बोलून प्रश्न लगेच निकाली काढा.

Relationship Tips | Dainik Gomantak

स्पेस देणं शिका

नात्यामध्ये कितीही प्रेम असले तरी जोडीदाराला त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य द्या. स्वतःचे छंद आणि मित्रांसाठी वेळ मिळाल्याने नात्यातील गोडवा अधिक वाढतो.

Relationship Tips | Dainik Gomantak

भूतकाळात जगू नका

जुन्या भांडणांचे उखाणे पुन्हा पुन्हा काढून जोडीदाराला टोमणे मारणे टाळा. घडून गेलेल्या गोष्टी विसरुन आजचा दिवस आनंदाने जगण्यावर भर द्या.

Relationship Tips | Dainik Gomantak

कौतुक करायला विसरु नका

जोडीदाराने केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींची दखद घ्या आणि त्यांचे कौतुक करा. 'थँक्यू' आणि 'आय लव्ह यू' हे छोटे शब्द नात्यात जादूचे काम करतात.

new relationship tips | Dainik Gomantak

ऐकण्याची सवय ठेवा

फक्त स्वतःचेच म्हणणे खरे न करता, जोडीदाराची बाजूही शांतपणे ऐकून घ्या. चांगले ऐकल्यामुळे एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास अनेक पटींनी वाढतो.

Relationship Tips | Dainik Gomantak

चुका मान्य करा

अहंकार बाजूला ठेवून स्वतःची चूक वेळेवर मान्य करायला शिका. एक 'सॉरी' मोठे वाद क्षणार्धात संपवून नातं अधिक मजबूत करु शकते.

Relationship Tips | Dainik Gomantak

एकत्र क्वालिटी टाईम घालवा

मोबाईल आणि सोशल मीडिया बाजूला ठेवून आठवड्यातून एकदा तरी डेटवर जा. एकत्र घालवलेले निवांत क्षण नात्याला नेहमी ताजेतवाने आणि तरुण ठेवतात.

Relationship Tips | Dainik Gomantak

Milk Honey Benefits: रात्री झोप येत नाही? कोमट दुधात फक्त 1 चमचा मध मिसळा आणि जादू पाहा!

आणखी बघा