दैनिक गोमन्तक डिजिटल
फायबरने भरपूर ओट्स उपमा, रव्याऐवजी ओट्समध्ये आवडत्या भाज्या टाकून बनवा झटपट उपमा. हा पचनास हलका असतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
अंड्याची भुर्जी ,अंडी, कांदा-टोमॅटो परतून ५ मिनिटांत बनवा खमंग भुर्जी!
रव्याचे अप्पे ,दह्यात रवा अन् भाज्या भिजवून झटपट अप्पे पात्रात शेका.
प्रोटीनयुक्त पनीर सँडविच, ब्राऊन ब्रेडमध्ये किसलेले पनीर, कोथिंबीर अन् हलके मसाले भरून टोस्ट करा. दिवसभर ताजी ऊर्जा मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
आयर्न अन् प्रोटीनने समृद्ध धिरडे, बेसनाच्या पिठात बारीक चिरलेला पालक अन् कोथिंबीर मिसळून तव्यावर खमंग धिरडे बनवा. हे अगदी १० मिनिटांत तयार होते.
झटपट फ्रूट-नट्स स्मूदी, केळी, सफरचंद, दूध आणि मूठभर सुकामेवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. शिजवण्याची कटकट नाही आणि पोटही बराच वेळ भरलेले राहते.
मोड आलेली मटकी/मूग भेळ, मोड आलेल्या मुगात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर अन् लिंबाचा रस पिळून बनवा चटपटीत भेळ. हा प्रोटीनचा उत्तम खजिना आहे.