गोमन्तक डिजिटल टीम
आपन कधी कधी साध्या सोप्या गोष्टी विसरून जातो, तर त्याचा आपल्याला फटका देखील बसू शकतो. जर असे तुम्हाला सतत होत असेल तर त्या गोष्टीला दुर्लक्ष न करता तुम्ही नियमितपणे आसने करू शकता जेणेकडून तुमची स्मरणशक्ती वाढेल.
तुम्ही मेडीटेशन करू शकता हे स्मरणशक्ती ठेवण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो.
तुम्ही योगा आणि श्वसनाचे व्यायाम देखील करू शकता त्याने रक्त आणि ऑक्सिजन वाढते त्याचा आपल्या मेमरीसाठी चांगला फायदा होतो.
वृक्षासनामुळे रक्ताभिसरणक्रिया सुरळीत होते आणि त्याने आपला ताण कमी होऊन स्मरणशक्ती चांगली राहते.
सर्वांगासन हे आसन केल्याने तुमचे मन शांत राहते. हे तुमचे मेमरी चांगली ठेवण्यासाठी उत्तम आसन आहे.
पश्चिमोत्तानासन हे आसन स्ट्रेचिंगसाठी असले तरी देखील मन स्थिर होण्यासाठी याचा उपयोग होतो.
हलासन हे स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचे आसन आहे, याने बॉडी रिलॅक्स झाल्याने मेमरी चांगली राहण्यास मदत होते.
शीर्षासनामुळे मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो आणि स्मरणशक्ती वाढण्यास त्याचा फायदा होतो.