Sameer Amunekar
दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने चेहरा धुवून करा. नैसर्गिक क्लिंजर म्हणून तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता, ज्यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाते.
आठवड्यातून दोनदा नैसर्गिक स्क्रब वापरा. तांदळाचे पीठ आणि मध एकत्र करून लावल्याने मृत त्वचा (Dead Skin) निघून जाण्यास मदत होते.
त्वचेचे पीएच (pH) संतुलन राखण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा. हे नैसर्गिक टोनर म्हणून उत्तम काम करते आणि त्वचेला ताजेतवाने ठेवते.
त्वचा आतून टवटवीत ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि नैसर्गिक ग्लो येतो.
त्वचा मऊ ठेवण्यासाठी कोरफड जेल (Aloe Vera Gel) किंवा खोबरेल तेलाचा वापर करा. हे त्वचेला ओलावा देते आणि कोरडेपणा दूर करते.
बाहेर जाताना किंवा घरात असतानाही सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन लावा. यामुळे टॅनिंग आणि अकाली सुरकुत्या रोखता येतात.
रात्री किमान ७-८ तासांची शांत झोप घ्या. झोपेत त्वचा स्वतःची दुरुस्ती (Repair) करते, ज्यामुळे सकाळी चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसतो.