Winter Health Tips: थंडीत दररोज एक संत्री खाल्ल्यास काय होते?

Manish Jadhav

संत्री

थंडीच्या दिवसात संत्री (Orange) बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. दररोज एक संत्री खाणे हे केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

Oranges | Dainik Gomantak

रोगप्रतिकारशक्ती वाढते

संत्र्यामध्ये 'व्हिटॅमिन सी' भरपूर असते. दररोज एक संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थंडीत होणारे सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गापासून बचाव होतो.

Oranges | Dainik Gomantak

चमकदार त्वचा

व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तजेलदार व चमकदार बनण्यास मदत मिळते.

Oranges | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारते

संत्र्यात फायबर (Fibre)चे प्रमाण चांगले असते. दररोज संत्री खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Oranges | Dainik Gomantak

डोळ्यांचे आरोग्य

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटीनॉइड्स असतात. हे घटक डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

Oranges | Dainik Gomantak

रक्तदाब नियंत्रण

संत्र्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशियम रक्तवाहिन्या शिथिल ठेवून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Oranges | Dainik Gomantak

वजन कमी करण्यास मदत

संत्री हे कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असलेले फळ आहे. ते खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि अनावश्यक खाणे टाळले जाते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Oranges | Dainik Gomantak

Marco Jansen: भारतात 46 वर्षांनंतर अद्भुत कारनामा; मार्को यानसेनने रचला नवा इतिहास!