Manish Jadhav
गोव्यात सध्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा माहोल पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह जगातील दिग्गज कलाकारांनी फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे.
तुम्हीही फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने गोव्यात आला असाल तर थोडासा वेळ काढून पणजीतील या ठिकाणांना नक्की भेट द्या. ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहिल्यानंतर तुम्ही सुखावून जाल.
दोना पावला हे गोव्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मांडवी आणि झुआरी नद्यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतं.
आत्माराम गायतोंडे यांनी 1932 मध्ये पणजीत कॅफे सेंट्रल सुरु केले. गोवन फूडचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही कॅफे सेंट्रलला नक्की भेट दिली पाहिजे.
तातो हे गोमंतकीयांचे सर्वात आवडते ठिकाण आहे, जे भजी आणि चाहसाठी प्रसिद्ध आहे. विविध स्नॅक्ससाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. पणजीतील प्रसिद्ध चर्चपासून हे ठिकाण अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे.
आदिल शाह पॅलेस पणजीममधील सर्वात जुनी इमारत म्हणून ओळखली जाते, पणजीपासून 3.6 किमी अंतरावर मांडवी नदी जवळ हा पॅलेस आहे. हा पॅलेस गोव्यातील सर्वात महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे.
जर तुम्ही पणजीत असाल तर आझाद मैदानासमोर असलेल्या मारिओ मिरांडा गॅलरीला नक्की भेट द्या. कलात्मकतेचा सुंदर नजारा इथे तुम्हाला पाहायला मिळतो.