Akshay Nirmale
मंदिरा बेदी ही केवळ अभिनेत्री नाही. तर ती टीव्ही प्रेझेंटर, फॅशन डिझायनर, निर्माती देखील आहे. सध्या मंदिरा तिच्या रिलेशनशिपच्या चर्चेने लाईमलाईटमध्ये आली आहे.
मंदिराचे पती आणि फिल्ममेकर राज कौशल यांचे जून 2021 मध्ये हार्ट अॅटॅकुळे निधन झाले होते. सध्या ती सिंगल पॅरेंट आहे.
दरम्यान, सध्या मंदिराचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ती तिच्या मित्रासोबत रोमँटिक पोजमध्ये दिसते आहे.
मंदिरा आणि तिचा मित्र आदित्य मोटवानी यांचे अनेक रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते.
दोघ थायलंड व्हेकेशनवर असतानाचे हे फोटो आहेत. त्यातून दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काही असावे, अशी चर्चा होती. आता पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे.
मंदिराने हा फोटो गेल्या वर्षी मे महिन्यात सोशल मीडियात शेअर केला होता. त्यात तिने म्हटले होते की, या फोटोतून दिसते तु माझ्यासाठी काय आहेस?
मंदिराला वीर नावाचा एक मुलगा असून 2020 मध्ये तिने तारा नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते.